1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 18 एप्रिल 2023 (12:17 IST)

महाराष्ट्रात 75 हजार पदांची मेगा भरती

jobs
राज्य सरकार थेट सेवा कोट्यातील 75 हजार पदांची मेगा भरती करणार आहे. ही पदे 15 ऑगस्टपूर्वी भरण्यात येणार असून सर्व जिल्हा परिषदांमधील ‘गट-क’ संवर्गातील 18 हजार 939 पदे एकाचवेळी भरण्यात येणार आहेत. यासाठी  ऑनलाइन परीक्षा आयबीपीएस आणि टीसीएस या खासगी कंपन्या घेणार आहे.
 
 12 एप्रिल रोजी ग्रामविकास विभागा कडून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र आदेश जारी करण्यात आले. 16 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार, 31 डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदांमध्ये थेट सेवा भरतीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी शिथिल करण्यात आली.
 
तसेच, मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार, या परीक्षे साठी पूर्वी अर्ज केलेले सर्व उमेदवार देखील परीक्षेला बसू शकतील. असेही आदेशात म्हटले आहे. या संदर्भात येत्या काही दिवसांत सर्व जिल्हा परिषदांना त्यांच्या भरतीच्या जाहिरातीचा नमुना, आरक्षणनिहाय रिक्त पदे, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता यांची सविस्तर माहिती कंपनीला द्यावी लागणार आहे.भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा आयबीपीएस आणि टीसीएस या कंपन्या घेणार. 
उमेदवारांना भरतीशी संबंधित काही माहिती किंवा शंका असल्यास त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करावी. असे निर्देश देण्यात आले आहेत. 
 
 
Edited By- Priya Dixit