सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : बुधवार, 9 मार्च 2022 (15:01 IST)

MPSC Bharti 2022 : 1206+ रिक्त पदांची भरती सुरु

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत दंत शल्यचिकित्सक, उपनिबंधक, सहायक आयुक्त – पशुसंवर्धन, वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उप विभागीय जल संधारण अधिकारी पदांच्या एकूण 916 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2022 आहे.
 
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप डाउनलोड करु शकता.
 
पदाचे नाव – दंत शल्यचिकित्सक, उपनिबंधक, सहायक आयुक्त – पशुसंवर्धन, वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उप विभागीय जल संधारण अधिकारी
पद संख्या – 916 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज शुल्क –
अमागास  – रु. 719/-
मागासवर्गीय- रु. 449/-
वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 40 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (Online Application Forms)
अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 फेब्रुवारी 2022
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
 
अटी व शर्ती – MPSC भरती 2022
 
अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
 
आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.
अर्ज सुरू होण्याची तारीख 21 फेब्रुवारी 2022 आहे.
नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2022  करीता आवश्यक असलेली कागदपत्रे –
 
अर्जातिल नावाचा पुरावा
वयाचा पुरावा
शैक्षणिक पात्रता इ. चा पुरावा
अनुभवाचा पुरावा
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
नॉन क्रिमिलेर प्रमाणपत्र
पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा इ.