रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (15:12 IST)

NABARD Recruitment 2022 नाबार्डमध्ये 177 विकास सहाय्यक पदांसाठी भरती, पदवीधर अर्ज करा

jobs
NABARD Recruitment 2022: नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ने विकास सहाय्यक पदाच्या 177 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 15 सप्टेंबर 2022 पासून सुरू होतील आणि त्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2022 अशी निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार www.nabard.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. विकास सहाय्यकांच्या 173 आणि विकास सहाय्यक हिंदीच्या 4 पदे रिक्त आहेत.
 
पात्रता
विकास सहाय्यक - किमान 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. SC, ST आणि दिव्यांग प्रवर्गासाठी 50% गुणांची सक्ती नाही.
 
वयोमर्यादा - 21 वर्ष ते 32 वर्ष 
 
पे स्केल - Rs.13150-750(3) - 15400 – 900(4) – 19000 - 1200 (6) –
26200 – 1300 (2) – 28800 – 1480 (3) – 33240 – 1750 (1) –
34990 (20 years)
 
पगार : 32000 रुपये दरमहा 
 
अर्ज शुल्क
जनरल, ओबीसी आणि EWS- 450 रुपये
एससी, एसटी आणि दिव्यांग - 50 रुपये