रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (11:15 IST)

NIT Trichy : त्रिचीमध्ये सल्लागार पदासाठी भरती, अर्ज कसा करावा जाणून घ्या

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्रिची कन्सलटंटच्या रिक्त पदासाठी अनुभवी उमेदवारांच्या शोधात आहे. ज्या तरुणांकडे सी.ए, आई.सी.डब्लू. एम.कॉम, एम.बी.ए ची पदवी आणि अनुभव आहे, त्यांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही सुवर्ण संधी आहे. अनुभवी उमेदवारांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार.
 
महत्वाच्या तारख्या आणि माहिती -
पदाचे नाव - सल्लागार (वित्त)
पदांची संख्या - एकूण 1 पद
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 1 नोव्हेंबर, 2020
 
स्थळ - त्रिची 
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 
 
पदाचा तपशील 2020
वय मर्यादा - 
उमेदवाराचे कमाल वय वर्ष 65 मान्य असेल आणि आरक्षित प्रवर्गाला वयात सूट देण्यात येईल. 
 
वेतनमान - 
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 50,000 ते 80,000 /- वेतन देण्यात येणार.

पात्रता -
उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेमधून सी.ए, आई.सी.डब्लू.ए, एम.कॉम, एम.बी.ए पदवीधारी असणे आवश्यक आहे आणि त्याला अनुभव असणे गरजेचे आहे.
 
निवड प्रक्रिया -
उमेदवाराची निवड प्रक्रिया मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
 
अर्ज प्रक्रिया - 
पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यावर अर्ज करत असल्यास, त्याचा सह शिक्षण आणि इतर पात्रता, जन्म तारीख आणि इतर आवश्यक माहिती आणि स्वतःची कागदपत्रे प्रतिबंधित प्रतीसह अर्ज निश्चित तारखेच्या पूर्वी पाठवावे.
अधिक माहितीसाठी येथे https://www.nitt.edu/home/other/jobs/ क्लिक करा.