NTPC Recruitment 2022: नॅशनल थर्मल पॉवरमध्ये एक्झिक्युटिव्हच्या 55 पदांसाठी भरती
NTPC भर्ती 2022: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) ने कार्यकारी पदाच्या 55 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही भरती ठराविक मुदतीसाठी असेल. NTPC च्या या भरतीमध्ये अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार
careers.ntpc.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल आहे.
NTPC सूचनेनुसार,एक्झिक्युटिव्ह (कम्बाइंड सायकल पॉवर प्लांट - O&M) साठी 50 जागा आणि एक्झिक्युटिव्ह (ऑपरेशन्स - पॉवर ट्रेडिंग) साठी 4 पदे आणि एक्झिक्युटिव्ह पॉवर ट्रेडिंगसाठी एक पद रिक्त आहे.
NTPC कार्यकारी भरतीसाठी पात्रता निकष: उमेदवारांनी इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. याव्यतिरिक्त, उमेदवारांना किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना अर्जाची पात्रता, अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहितीसाठी भरती अधिसूचना या संकेत स्थळावर जाऊन तपासून घ्यावी.