शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जुलै 2022 (08:32 IST)

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये तब्बल ११६६ सरकारी पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

govt jobs
सध्याच्या काळात अनेक शिक्षण घेतलेले तरुण बेरोजगार आहेत त्यांना सरकारी नोकरीची अपेक्षा असते, परंतु सरकारी नोकरी नाही मिळाली तर एखाद्या कार्पोरेशन मध्ये तरी नोकरी मिळावी अशी अपेक्षा असते ती अपेक्षा आता पूर्ण होऊ शकते, कारण पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (PGCIL) इलेक्ट्रीशियन आणि एचआर एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज मागवले आहेत. याअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची 1166 पदे भरण्यात येणार आहेत. दि. 31 जुलै 2022 पर्यंत उमेदवार PGCILच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
 
या भरती प्रक्रियेअंतर्गत, कॉर्पोरेट सेंटर, गुरुग्राम, फरिदाबाद, जम्मू, लखनऊ, पाटणा, कोलकाता, शिलाँग, ओडिशा प्रकल्प, भुवनेश्वर, नागपूर, बडोदा, हैदराबाद आणि बंगळुरू येथे भरती केली जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना NAPS किंवा NATS वेबसाइटवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरूवात झालेली तारीख – दि. 7 जुलै 2022ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 31 जुलै 2022
 
A ) इलेक्ट्रीशियन – इलेक्ट्रीशियनमध्ये आयटीआय व इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा.डिप्लोमा (सिव्हिल) – सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा.ग्रॅज्युएट (इलेक्ट्रिकल) – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा.B ) एचआर एक्झिक्युटिव्ह – एमबीए (एचआर) / कार्मिक व्यवस्थापनात पदव्युत्तर डिप्लोमा.C ) सीएसआर एक्झिक्युटिव्ह – मास्टर इन सोशल वर्क (MSW) किंवा रुरल डेव्हलपमेंट.
 
ग्रॅज्युएट- 15,000 रुपयेएक्झिक्युटिव्ह 15,000 रुपयेडिप्लोमा- 12,000 रुपये
अर्ज कोणासाठी नाही := 
– ज्यांचे अंतिम परीक्षेचे निकाल आलेले नाहीत.
– ज्याने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली नाहीत.
– कोणत्याही कालावधीसाठी कोणत्याही संस्थेमध्ये शिकाऊ प्रशिक्षण घेतले आहे.
– ज्याच्याजवळ 1 वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे.