सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (08:21 IST)

रेल्वेत बंपर भरती : परीक्षा न घेता थेट मुलाखती; संधी सोडू नका

भारतीय रेल्वे हा देशात सर्वाधिक नोकऱ्या देणारा सरकारी विभाग म्हणून ओळखला जातो. कारण या विभागात वेळोवेळी विविध पदांवर भरती होत राहते. सध्या भारतीय रेल्वेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे. रेल्वेने प्रशिक्षणार्थीच्या १,६६४ पदांवर भरती सुरू केली आहे. तसेच उमेदवारांची कोणतीही परीक्षा न घेता या पदांवर नियुक्ती केली जाईल.
 
रेल्वेने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया दि. २ ऑगस्टपासून सुरू झाली असून ती दि. १ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती प्रयागराज, झाशी आणि आग्रा विभागात केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे, उमेदवारांना रेल्वेमध्ये फिटर, वेल्डर, विंडर, मशिनिस्ट, सुतार, इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक आणि वायरमन या ट्रेडसाठी अॅप्रेंटिसशिप करण्याची संधी आहे.
भरती प्रक्रिया आणि पदांशी संबंधित अधिक माहिती, उमेदवार आरआरसी प्रयागराजच्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. या विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेतून किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तथापि ८ वी पास उमेदवार वेल्डर, वायरमन आणि सुतार ट्रेडसाठी देखील अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १५ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेत शिथिलता राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार दिली जाईल.
 
सदर पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना कोणत्याही परीक्षेतून जावे लागणार नाही. वास्तविक, उमेदवारांची निवड या पदांवर गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवारांची १० वी आणि आयटीआय गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.