शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 6 नोव्हेंबर 2023 (16:30 IST)

Railway Recruitment 2023: रेल्वेत 12 वी उत्तीर्णांना नौकरीची सुवर्ण संधी, तपशील जाणून घ्या

govt jobs
Railway Recruitment 2023 : सरकारी नौकरी शोधणाऱ्या तरुणांना रेल्वेत नौकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. पश्चिम मध्य रेल्वेने वर्ष 2023 -2024 साठी स्काऊट्स आणि गाईड कोट्यात भरती काढली असून गट क  आणि गट ड साठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार  6 नोव्हेंबर 2023 पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकता. 
 
पात्रता- 
या साठी पात्रता 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण आहे.उमेदवारांनी इयत्ता 12 वी किंवा त्याच्या समक्ष परीक्षेत मान्यता प्राप्त मंडळाकडून 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावी.  
अनुसूचित जाती/ जमाती /माजी सैनिक /दिव्यांग(पिडब्ल्यूडी) उमेदवारांना गुण सूट दिली आहे. 
 
उमेदवारांची लिपिक सह टंकलेखनाचा वेग इंग्रजी 30 शब्द प्रति मिनिटं आणि हिंदी शब्द प्रति मिनिट असा 2 वर्षाच्या आतील असावा. 
 
वायो मर्यादा- गट ड  लेव्हल 2 साठी उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 23 वर्षे असावे. 
गट क लेव्हल 1 साठी उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 33 वर्षे असावे. 
 
वेतनमान- 
गट क साठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 63200 रुपये वेतनमान मिळेल आणि 
गट ड साठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 56900 रुपये वेतनमान मिळेल. 


Edited by - Priya Dixit