शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 20 जुलै 2019 (12:10 IST)

RRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज करणार्‍यांवर रेल्वेने काढले नोटिस

RRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) मध्ये एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज करणार्‍यांसाठी एक नोटिस काढला आहे. रेल्वेने नोटिसमध्ये म्हटले आहे, 'काही उमेदवारांनी आपल्या अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये मल्टीपल एज्युकेशन क्वालिफिकेशन (बर्‍याच प्रकारच्या शैक्षिक योग्यता)चा उल्लेख केला आहे आहे आणि एकापेक्षा जास्त पोस्टासाठी अर्ज केला आहे.' रेल्वेने नोटिसमध्ये म्हटले आहे की आवेदन प्रक्रिया संपल्यानंतर रेल्वेने उमेदवारांना आपल्या आवेदन पत्राची परत पुष्टी करण्यासाठी आणि पदाची प्राथमिकता आणि आपल्या शैक्षिक योग्यतेला रिवाइज करण्याची संधी दिली होती. पण फारच कमी उमेदवारांनी या संधीचा फायदा घेतला आहे. रेल्वेने आवेदनाच्या वेळेस अर्ज करणार्‍यांकडून कुठलेही प्रमाण पत्र मागितले नव्हते. अशात उमेदवारांकडून आवेदन पत्रात देण्यात आलेल्या शैक्षिक योग्यतेच्या आधारावर त्यांच्याद्वारे निवडलेल्या पोस्ट्सचे ऍडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे.  
 
रेल्वे ने नोटिसमध्ये म्हटले, 'उमेदवार आपल्या पोस्टप्रमाणे आपले ऍडमिट कार्ड फारच सावधगिरीने डाउनलोड करावे. पद, ज्याची ते शैक्षणिक योग्यता ठेवतात, ची निवड करूनच ऍडमिट कार्ड डाउनलोड करावे. जर निवड प्रक्रियेत कुठल्याही टप्प्यात उमेदवाराने दिलेली माहिती चुकीची आहे आढळून आले तर त्याचे आवेदन रद्द करण्यात येईल.'
 
या भरती परीक्षेचे सीबीटी-1 चे ऍडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे आरआरबी पॅरामेडिकल कॅटेगरीत 1937 पदांवर भरती करण्यात येईल. यात डायटीशियन, स्टाफ नर्स, डेंटल हाइजीनिस्ट इत्यादी पद सामील आहे. आरआरबी पॅरामेडिकल भरती परीक्षेत मार्क्स कसे कॅलकुलेट होतील, याचा फॉर्मूला देखील रेल्वे भरती बोर्डाने प्रसिद्ध केला आहे.