रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 1 जुलै 2019 (09:49 IST)

आता चिंता नको तुमचे जेवण तयार होतांना रेल्वेत लाइव्ह पहा

रेल्वेच्या जेवणाच्या दर्जाबाबत अनेकदा अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या तक्रारी दूर करण्यासाठी रेल्वेने एक नवा उपक्रम सुरु केला असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती, बैठकीत जेवणासंबंधीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. तसेच, या तक्रारी लवकरात लवकर कशा सोडवता येतील यावर विचार झाला होता. आयआरसीटीसी द्वारे चालवण्यात येणाऱ्या बेस किचनमध्ये अनेक प्रिमिअम गाड्यांसाठी जेवण बनते. पीयूष गोयल यांनी  बेस किचनमधून लाईव्ह फीड देण्यासाठीची व्यवस्था लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले आहेत. या लाईव्ह फीडद्वारे प्रवासी त्यांचं जेवण कसं तयार होत आहे आणि त्यासाठी हवी ती काळजी घेतली जात आहे की नाही, हे पाहू शकणार आहेत. त्यामुळे आता जेवण तयार होतांना ग्राहक त्यांच्यावर नजर ठेवू शकणार असून त्यामुळे दर्जा सुधारला जाणार हे नक्की .