शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

रेल्वेमध्ये 50% पदांवर महिलांची भरतीः पीयूष गोयल

रेल्वेत 9 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती हवालदार आणि पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी असेल. यामध्ये महिलांना 50 % टक्के स्थान देण्यात येणार आहे, अशी घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत केली आहे.
 
पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून यासंबंधी माहिती दिली आहे.
 
रेल्वेत 9 हजार पदांची भरती करण्यात येणार असून त्यात महिलांना 50 टक्के संधी देण्यात येणार आहे.
 
2019 ते 2021 पर्यंत 10 टक्के आरक्षणांतर्गत 4 लाखांहून अधिक लोकांना रोजगार देण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं.