शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जून 2019 (16:50 IST)

लिंगायत समाजातील विचारवंत, उत्तम व्याख्याते प्रा. राजशेखर सोलापुरे यांना जबर मारहाण

लातूर जिल्ह्यातील लिंगायत समाजातील विचारवंत, उत्तम व्याख्याते प्रा. राजशेखर सोलापुरे अज्ञातांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर राजीव गांधी चौकाजवळील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल रात्री प्रा. सोलापुरे मोटारसायकलवरुन घराकडे जात असताना हा प्रकार घडला. राजीव गांधी चौकात मागून एक कार आली, अचानक थांबली, दार उघडले गेल, या दारावर प्रा. सोलापुरे मोटारसायकलसह आपटले. त्याचवेळी कारमधून उतरलेल्या दोघा तिघांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांचा मोबाईल फोडण्याचा प्रयत्न झाला. छातीवर बसून जबर मारहाण केली. कमरेच्या पट्ट्यानेही हल्ला केला. यात प्रा. सोलापुरे यांना जबर मुका मार लागला. नाकाचे हाडही मोडले त्यांना आता नाक, कान, घसा तज्ञाकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मारहाण करणारे खंडणीची मागणी करीत होते. यातील एका आरोपीला प्रा. सोलापुरे ओळखतात. यापूर्वीही असा प्रकार झाल्याचे सोलापुरे यांनी सांगितले. या प्रकरणी लातुरच्या ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रा. सोलापुरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करीत अनेक संघटना पुढे आल्या आहेत.