शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

वडिलाने घेतलं 10 हजाराचे कर्ज, दृष्टांनी मुलीला मारून टाकले, बॉलीवूडमध्ये देखील आक्रोश

अलीगढ- उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये अडीच वर्षाच्या मुलीची हत्या केली गेली. पोलिसानुसार मात्र 10 हजार रुपयांसाठी इतक्या खालच्या थराला जाऊन हे कृत्य केलं गेलं.
 
मृतक मुलीच्या वडलांनी 10,000 रुपयांचे कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडू शकण्यात अक्षम असल्यामुळे मुलीला किडनॅप केले गेले. तीन दिवसांनी घराजवळच्या कचरापेटीत तिचे शव सापडले. पोस्टमार्टम रिपोर्टप्रमाणे गळा घोटून 
 
हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
 
पोलिसांनी म्हटले की हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात पाठवण्यात येईल. येथे एका अडीच वर्षाच्या मुलीचं खून करून शव कचरापेटीत फेकण्यात आले होते.
या प्रकरणात सोशल मीडियावर देखील राग दिसून येत आहे. तसेच बॉलीवूड कलाकार अभिषेक बच्चन, सनी लियोनी, सोनम कपूर, अनुपम खेर सह अनेक दिग्गज कलाकारांनी या घटनेचा विरोध केला आहे.
 
अभिनेत्री सोनम कपूरने यावर प्रतिक्रिया देत म्हटले की त्यात मासूम निरागस मुलीसोबत घडलेली घटना दुःखद आहे. या प्रकारे आपसातील द्वेष मिटवणे पर्याय नाही.
 
अभिनेता अभिषेक बच्चनने लिहिले की एक घृणात्मक आणि क्रोधित करणारी घटना आहे आणि ते निःशब्द आहे. कोणी इतकं क्रूर विचार तरी कसं करू शकतं. 
 
अभिनेत्री सनी लियोनीने भी या घटनेवर नाराजगी दर्शवली. तिने त्या मुलीकडे माफी मागत ट्विट केले की ती अशा दुनियेत आहे जिथे लोकं माणुसकी विसरून चुकले आहे.
 
अनुपम खेरने या धक्कादायक घटनेवर आक्रोश व्यक्त करत म्हटले की आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. या प्रकराच्या प्रकरणात इतर कोणतीच शिक्षा पुरेसी नाही.