1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भाजपच्या एकाही विजयी मिरवणुकीला परवानगी नाही: ममता

BJP victorious rally
भाजपच्या एकाही विजयी मिरवणुकीला परवानगी देण्यात येणार नाही, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी जाहीर केलं.
 
याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश ममतांनी पोलिसांना दिले आहेत. 
 
उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील निमतामध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते निर्मल कुंडू यांची हत्या झाली. त्यांच्या घरी पोहोचलेल्या ममतांनी म्हटलं की, "मला माहिती मिळाली आहे की, भाजपने विजयी मिरवणुकांच्या नावे हुगली, बांकुरा, पुरुलिया आणि मिदनापूर जिल्ह्यांमध्ये गोंधळ घातला. आता अशी एकही विजय मिरवणूक निघणार नाही."
 
"लोकसभा निवडणुकांचे निकाल लागून दहापेक्षा अधिक दिवस झाले आहेत, त्यामुळे आता कुठली विजयी मिरवणूक निघायला नको," असंही त्यांनी म्हटलं आहे.