शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 21 जुलै 2021 (22:03 IST)

सप्टेंबर महिन्यात होणार ‘टीईटी' परीक्षा

राज्यातील विविध शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी) घेतली जाणार असून ही परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते पाचवी गट आणि दुसरा इत्ता सहावी ते आठवी गट अशा दोन गटांसाठी ही परीक्षा असणार आहे. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर शिक्षण विभागाकडून ही टीईटी घेतली जाणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया आणि त्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे.