1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 18 जुलै 2021 (10:11 IST)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आज सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक आयोजित केली जाईल, पीएम मोदीही हजर असतील

An all-party meeting will be held at 11 a.m. today before the rainy session of Parliament
सोमवारपासून सुरू होणार्‍या संसदेच्या मान्सून अधिवेशनापूर्वी आज सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात आली आहे.संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही बैठक बोलविली आहे, या बैठक मध्ये पंतप्रधान मोदीही हजर राहू शकतात. 
 
रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे देखील खालच्या सभागृहातील सर्व नेत्यांसमवेत बैठक घेतील.संसदेच्या प्रत्येक अधिवेशनापूर्वी अशा बैठका बोलवल्या जातात.
 
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होईल आणि ते 13 ऑगस्टपर्यंत चालतील.या दरम्यान,संसद मध्ये 19 दिवस काम सुरु असणार.कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर संसदेचे हे पहिले अधिवेशन असणार आहे. 
 
यावेळी मान्सूनचा सत्रामध्ये मोसम वादळ होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर,कोविडमधील गैरव्यवस्थापन आणि लसीची कमतरता अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी भाजप सरकारला घेराव घालण्याची तयारी केली आहे.
 
दरम्यान, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही कोरोनाशी संबंधित तयारीचा आढावा घेतला आहे. ते म्हणाले की पावसाळ्याच्या सत्रात कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे पालन केले जाईल.त्यांनी सांगितले की ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले नाहीत त्यांना संसद आवारात प्रवेश करण्यापूर्वी आरटी-पीसीआर चाचणी घ्यावी लागेल.