सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (10:48 IST)

चेक्स शर्टस्‌ची चलती

चेक शर्ट हे अनेक प्रकारांमध्ये सध्या उपलब्ध आहेत. हे शर्ट टीशर्टसारखे कॅज्युअलही असतात व यातून क्लासिक ड्रेस शर्टसारखी फॉर्मलिटीही दिसते. चेक्स शर्टसोबत आपल्याला अनेक लूक बनवता येतात.
 
कूल कॅज्युअल
व्हाईट टीशर्टवर एखादा चेक्स शर्ट ईझी जॅकेटसारखा घालता येतो. यामुळे आपल्याला एक कूल लूक मिळतो. याप्रकारची स्टाईल जीन्स आणि चीनोज अशा दोन्ही प्रकारांवर चांगली दिसते. याचबरोबर कॅज्युअल कॅनव्हास शूज आणि स्लिपऑन्सही घालता येतात.
 
सेमी फॉर्मल
चेक्स शर्टसोबत लेनेन पँट घालावी. यामुळे आपला लूक थोडासा फॉर्मल होईल. याचबरोबर अनेक प्रकारचे कलर कॉम्बिनेशन ट्राय करावेत. व्हरायटीसाठी गडद रंगाची पँटही वापरणे चांगले आहे. या लूकसोबत स्टायलीश ङ्खुटवेअर म्हणून सुएड डिजर्टचा पर्याय चांगला आहे.
 
सॅटर्डे नाइट
चेक्स शर्टसहित नेवी ब्लेझर घालणे आपल्या रिलॅक्स पार्टी लूकसाठी चांगले असते. यासोबत जीन्स आणि चिनोज वापरणे चांगले असते. फुटवेअरमध्ये लोफर वापरणे हे आपल्या स्टाईलसाठी उत्तम असते. फुटवेअरमध्ये सध्या बोल्ड कलर्स ट्रेंडमध्ये आहेत. लाल आणि पिवळे लोफर्स वापरल्याने पार्टीमध्ये आपली एक वेगळी प्रतिमा दिसेल.
 
रिलॅक्स ऑफिस वेअर
चेक्स शर्टवर जॅकेटच्या जागी कार्डिगन घालावे. ज्या ऑफिसमध्ये युनिफॉर्म नाही, त्या ऑफिसमध्ये चेक्स शर्ट टायसोबत घातल्याने आपल्याला एक सेमीफॉर्मल ऑफिस लूक मिळण्यास मदत होते. आपण एखाद्या क्रिएटिव्ह क्षेत्रात असल्यास हा लूक आपल्याला एकदमच शोभून दिसेल.
 
एक रफ अँड टफ लूक 
चेक्स शर्टसोबत लेदर जॅकेट आणि कॉम्बॅट बूटस्‌ घातल्यामुळे एक रफ अँड टफ लूक मिळतो. थंडीच्या दिवसात हा लूक ट्राय करणे उत्तम. हा लूक परिधान करताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. फेडेड किंवा वॉश्ड आउट जीन्सच्या जागी सिंपल ब्लू जीन्स वापरणे चांगले आहे. यावर कॉम्बॅट बूटस्‌ वापरावेत, कारण त्यामुळे एकंदरीतच एक मस्क्युलीन लूक मिळण्यास मदत होते.
 
 अनिल विाधर