गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मार्च 2021 (09:10 IST)

फॅशन- 45 प्लस असाल तर भारतीय पोशाखात आपली वेगळी स्टाईल दाखवा

जस जस वय वाढतं स्त्रियांच्या स्टाईलमध्ये देखील बदल होऊ लागतात.टीनएज मध्ये मुली वेगळ्या स्टाईलने आपले लूक वेगळे करतात. तर मध्यम वयाच्या स्त्रिया असे काही परिधान करतात जेणे करून त्यांचे लूक मोहक दिसेल.म्हणून वयाचा 40 -45 वर्षांनंतर त्यांच्या कपाटात देखील भारतीय पोशाख अधिक असतात. केज्युअल पासून ऑफिस पार्टी मध्ये देखील त्या भारतीय पोशाखाला प्राधान्यता देतात.आपण देखील 40 प्लस असाल आणि भारतीय पोशाख घालण्याची आवड असेल तर या काही पोशाख परिधान करून आपण आपले लूक आणि स्टाईल बदलू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
 
* प्रिंटेड साडी लूक- 
आपण क्रीम कलर किंवा कोणत्याही फिकट रंगाची मल्टीकलर साडी स्लिव्हलेस ब्लाउज सह घालू शकता. आपण हे केज्युअल पासून ऑफिसमध्ये देखील घालू शकता. स्टाईलिश टच देण्यासाठी ऑक्सिडाइझ ज्वेलरी घालू शकता.
 
* सूटलूक-
आपण केज्युअल किंवा पारिवारिक समारंभात सूट घालू शकता. या सह आपण छोटंस  मंगळसूत्र किंवा पेंडेंट घालू शकता.आपण या सूट वर  मोठे इयरिंग्स घालू शकता. जेणे करून आपले एक वेगळेच लूक दिसेल. 
 
* लहंगा लूक- 
आपण लहंगा घालण्याची आवड ठेवता आणि एकाच पद्धतीने लहंगा घालून कंटाळा आला आहे तर आपण लहंगाच्या ब्लाउज च्या ऐवजी व्ही नेक क्रॉप टॉप घालू शकता. हे आपल्या लूक ला अधिकच स्टायलिश बनवेल.
 
*  पांढरा अनारकली सूट-
आपण अनारकली सूट देखील घालू शकता. आपण पांढऱ्या रंगाचा  अनारकली देखील घालू शकता या वर थ्रेडवर्क मॅचिंग बँगल्स आणि इयरिंग्स घालू शकता.हे आपल्याला वेगळे लूक देईल. 
 
* सिक्वेन्स स्टाईल लहंगा-
पार्टी मध्ये जायचे असल्यास प्लजिंग नेकलाईन स्लिव्हलेस ब्लाउज सह सिक्वेन्स स्टाईल लहंगा घालू शकता. आपण स्टेटमेंट ज्वेलरी आणि बोल्ड मेकअप करून आपल्या लूक ला छान करू शकता.