रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मार्च 2021 (08:20 IST)

प्लस साइजच्या महिलांसाठी हे खास वेस्टर्न वियर आऊटफिट

आपण प्लस साइज आहात. आपल्याला देखील काही वेस्टर्न ड्रेस परिधान करावेसे वाटते पण आपल्यावर हे शोभून दिसेल किव्हा नाही हाच प्रश्न मनात येतो .तर आपण काळजी करू नका. आम्ही सांगत आहोत काही असे वेस्टर्न ड्रेसेस जे घालून आपण छानच दिसाल आणि आरामदायक राहाल. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* ऑफ शोल्डर गाऊन- 
जर आपण एखाद्या समारंभात जाण्यासाठी तयार होत आहात तर आपण ऑफ शोल्डर गाऊन देखील घालू शकता. हे आपल्यावर छान दिसेल आणि यामुळे वेस्टर्न लूक देखील चांगला येईल. 
 
* सीक्वेन्स ड्रेस -
आपण सीक्वेन्स ड्रेस देखील घालू शकता.सैल स्लिव्ह्ज ठेवून आपण हा ड्रेस घालू शकता. हे आपल्याला छान दिसेल. 
 
* ब्लॅक आऊटफिट- 
आपल्याला कॅज्युअल मध्ये काही वेगळे घालायचे आहे जे आपल्यासाठी आरामदायी असेल तर आपण प्लॅन ब्लॅक शॉर्ट ड्रेस परिधान करू शकता या वर आपण स्नीकर्स घालाल तर हे अगदी उठून दिसेल. 
 
* नियॉन रंगाचे आऊटफिट- 
आपण एखाद्या नी लेन्थ शॉर्ट स्कर्टसह कोणत्याही नियॉन रंगाची जाकीट घालू शकता. स्कर्ट घालत नसाल तर आपण ब्लॅक रंगाची पॅन्ट देखील घालू शकता. हे आपल्याला नवीन लूक देईल.  
 
* ब्लॅक शॉर्ट ड्रेस- 
ब्लॅक रंगाची शॉर्ट ड्रेस घालून आपण मॅचिंग हेयरबॅन्ड लावून आपल्या लुकला अजून छान करू शकता या सह आपण स्नीकर्स घातल्याने आपले लूक अधिकच स्पोर्टी दिसेल.