गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By

श्राद्धपक्षातील आमसुलाची चटणी रेसिपी

Amsula-Chutney
श्राद्धपक्षात साधारणत: सात्त्विक पदार्थ बनवले जातात, आणि आमसुलाची चटणी ही एक उत्तम पर्याय आहे कारण ती साधी, स्वादिष्ट आणि पचायला हलकी आहे.  
साहित्य-
दहा- आमसूल पाण्यात भिजवलेले
तीन चमचे- साखर किंवा गूळ
एक चमचा- जिरे भाजलेले आणि दळलेले
अर्धा चमचा- हिंग  
एक मिरची  
एक चमचा- तूप
मीठ चवीनुसार
अर्धा कप- पाणी
कृती-
सर्वात आधी आमसूल वीस मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ते पिळून त्याचा रस वेगळा काढा आणि बाजूला ठेवा. आता एका छोट्या भांड्यात आमसूल रस, साखर किंवा गूळ  आणि थोडे पाणी घाला. मंद आचेवर हे मिश्रण उकळू द्या. तसेच एका छोट्या कढईत तूप गरम करा. त्यात हिंग आणि हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या. नंतर भाजलेले जिरे पावडर घाला. उकळलेल्या आमसूलच्या मिश्रणात तूप-मसाल्याची फोडणी घाला. चवीनुसार मीठ घाला आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्या. चटणी थंड झाल्यावर एका वाटीत काढा. व श्राद्धाच्या पदार्थांसोबत सर्व्ह करा. तसेच श्राद्धपक्षात कांदा आणि लसूण टाळले जाते, त्यामुळे ही चटणी पूर्णपणे सात्त्विक आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik