गुरूवार, 24 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By
Last Modified: बुधवार, 23 एप्रिल 2025 (08:00 IST)

Kairi Chutney उन्हाळ्यात बनवा कैरीची चटणी रेसिपी

Mango chutney
साहित्य-
कैरी 
कोथिंबीर  
पुदिन्याची पाने
हिरवी मिरची, 
मीठ
काळे मीठ
भाजलेले जिरे
हिंग
कृती-
सर्वात आधी कैरी स्वच्छ धुवून सोलून घ्या. आता सोलल्यानंतर त्यामधील बी काढून घ्या. व कैरीचे लहान तुकडे करा. आता ब्लेंडरमध्ये कैरीचे तुकडे, कोथिंबीर, पुदिना पाने, हिरवी मिरची घाला व पेस्ट तयार करा. आता यानंतर, चवीनुसार मीठ, काळे मीठ, भाजलेले जिरे आणि हिंग घाला. आता थोडे पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करा. आता तयार चटणी एका काचेच्या भांड्यात काढा. तर चला तयार आहे आपली कैरीची चटपटीत चटणी रेसिपी, पराठ्यांसोबत नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik