शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

फॅशन आली परतून

फॅशनच्या दुनियेत जुन्या गोष्टी परत येत असतात. रॅम्पवर सध्या 1990 च्या दशकातील फॅशन पुन्हा एकदा परत येतेय.  
 
* रिप्ड जीन्स हा प्रकार परत आलाय. 90च्या दशकात सलमान खान आणि संजय दत्त यांनी ही फॅशन हिट केली होती. आज रिप्ड जीन्स गाजत आहे. 
 
* 90च्या दशकात लोकप्रिय ठरलेली अूजन एक फॅशन म्हणजे ट्रॅक सूट. ट्रक सूटच्या फॅशनमध्ये बराच बदल झालाय. हुडीज आणि स्वेट शर्टस खूपच लोकप्रिय ठरले आहेत. रंगीत ट्रक सूट सध्या हिट ठरत आहेत. 
 
* बेसबॉल कॅप्स हा प्रकारही इन होता. या कॅप्समध्ये बरेच बदल झाले आहेत. वेगवेगळ्या फॅब्रिक्समध्ये ते लोगो आणि प्रिंट्ससह उपलब्द आहेत. 
 
* एअर जॉर्डन आणि स्निकर्स हा प्रकार 90च्या दशकात हित होता. डेनिम टी शर्ट किंवा थ्री पीस सूटसोबत स्निकर्स हिट ठरतात. 
 
* ढिले टी शर्ट, अॅनिमल प्रिंट्स, टाय डाय हा प्रकार हिट होता. ही फॅशन परत आली आहे.