बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Updated : मंगळवार, 13 जून 2023 (15:44 IST)

Hair Extensions काय आहे, कसे वापरतात जाणून घ्या

hair
हेयर एक्स्टेन्शन म्हणजे केसांची अशी एक्सेसरी आहे, ज्यामुळे आपण आपल्या लहान असलेल्या केसांना सोप्या पद्धतीने कोणतेही विग न वापरता अधीक लांब आणि दाट दाखवू शकता. केसांना लांब दाखविण्यासाठी पातळ एक्स्टेंशनला मानेच्या जवळ केसांमध्ये जोडलं जातं, ज्यामुळे केस खालून लांब आणि दाट दिसतात. 
 
हेयर एक्स्टेन्शन दोन रूपात असतात. नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्हीमध्ये आढळू शकतं. कृत्रिम किंवा सिंथेटिक एक्स्टेन्शन ही क्लिपऑन असतात, हे लावायला सोपे असतात. हे बऱ्याच शेड्स मध्ये आढळतात. जसे की लाल, निळे, पिवळे, तपकिरी, गुलाबी इत्यादी. तसेच नैसर्गिक हेयर एक्स्टेन्शन हे वास्तविक केसांवर प्रक्रिया करून तयार केले जाते.
 
हेयर एक्स्टेंशन कसे असतात - 
 
* क्लिपऑन एक्स्टेंशन - हे तात्पुरते एक्स्टेंशन असतात, जे एखाद्या खास पार्टीसाठी आपण वापरू शकता. क्लिपऑन एक्सटेन्शनला एका क्लिपच्या साहाय्याने केसांना जोडतात. पार्टी संपल्यावर आपण याला सहजपणे काढू शकता हे सर्वात सोपे असे एक्स्टेन्शन आहेत ज्याला आपण सहजपणे काढू किंवा घालू शकता.
 
* लाँग टर्म एक्स्टेन्शन - हे 4 ते 6 महिने चालतात. हे लावण्यासाठी केरॉटिन बॉण्ड वापरण्यात येत. बनावटी केसांच्या टिपाला केरॉटिन लावतात, ज्याला गरम रॉडने वितळवून खऱ्या केसांना जोडतात.
 
* टेम्पररी ग्लूऑन एक्स्टेन्शन - हे एक आठवड्यासाठी टिकून राहतात. टाळूला लिक्विड ग्लू लावून एक्स्टेन्शन चिटकवून देतात. याना काढण्यासाठी तेलबेस सॉल्व्हन्ट वापरले जातात.
 
काही खबरदाऱ्या घ्यावयाचा असतात -
 
* नैसर्गिक हेयर एक्स्टेन्शनची काळजी तशीच घ्यावी ज्याप्रमाणे आपण आपल्या नैसर्गिक केसांची घेता.
 
* आपले नैसर्गिक केस किमान 4 इंच लांब असायला हवे, तेव्हाच त्यामध्ये एक्स्टेन्शन लावता येऊ शकत.
 
* एकाच वेळी कमीतकमी 2 एक्स्टेन्शन आणि जास्तीत जास्त 10 ते 15 एक्स्टेन्शन लावता येऊ शकतं.
 
* हेयर एक्स्टेन्शन धुताना डोकं स्थिर ठेवावं आणि सल्फेट नसलेला मॉइश्चराइजिंग शॅम्पू वापरावं.
 
* केसांना लहानलहान भागात विभागून चांगल्या प्रकारे कोरडे करावे.
 
* एक्स्टेन्शन जास्त काळ ठेवू इच्छित असल्यास, त्यांना जास्त काळ ओले ठेऊ नका.