Fashion Tips: लेगिंग्ज घालण्याची योग्य पद्धत माहित आहे का? जाणून घ्या
जेव्हा जेव्हा आपल्या सोयीच्या कपड्यांची गोष्ट केली जाते तेव्हा आपण लेगिंग्जचा विचार करतो. कारण हे घालण्यासाठी खूप आरामदायक असतात. पण हे घालताना आपण काही चुका करतो ज्यामुळे हास्याचे पात्र बनतो.
आपल्याला लेगिंग्ज घालण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? जर होय, तर ही एक चांगली गोष्ट आहे. आणि जर आपले उत्तर नाही आहे तर या लेखा मधून आपल्याला या बद्दल माहिती मिळेल.
बऱ्याच वेळा काही बायका लेगिंग्ज सह क्रॉप टॉप घालतात. हे चुकीचे आहे. जर आपण देखील अशी चूक करत असाल, तर आजच असे करणे थांबवा, कारण लेगिंग्ज सह कधी ही क्रॉप टॉप घालत नसतात. हे दिसायला खूपच विचित्र दिसतं.
हे झाले क्रॉप टॉप बद्दल पण आपण लहान टॉप वर लेगिंग्ज घालण्याचा विचार करतं असाल तरी देखील याचा विचार करू नका, आपण बारीक असाल तरी ही. लहान टॉपसह लेगिंग्ज घालण्याची ही पद्धत आपल्यावर साजेशी दिसणार नाही.
आपल्याला अशे अंतर्वस्त्र परिधान करावे की जे हेमलाईन लेगिंग्जच्या वर दिसू नये. अशा प्रकारे लेगिंग्ज घालणं फार विचित्र दिसेल आणि आपल्यासाठी ते आरामदायी देखील नसेल.
प्रिंटेड लेगिंग घालण्याचा प्रयत्न करू नका -
आपण प्रिंटेड लेगिंग्ज वापरू नका तेच आपल्यासाठी योग्य असेल, कारण हे घालण्यात अजिबात छान दिसत नाही. म्हणून जर आपण लेगिंग्ज खरेदी करण्यासाठी जात असाल तर प्रिंटेड लेगिंग्ज घेऊ नका.