शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (16:02 IST)

हिवाळ्यात स्टायलिश लूकसाठी या प्रकारे घ्या शॉल

हिवाळ्याच्या हंगामात लोक नेहमी फॅशनेबल आणि स्टायलिश दिसायला प्राधान्यता देतात आणि त्यांना हे आवडते देखील. त्यांना आपल्या हिवाळ्याच्या शैलीला घेऊन काही न काही वेगळे करावेसे वाटते. आपण देखील त्या पैकी एक आहात तर आम्ही आपल्यासाठी हिवाळ्यातील काही खास टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण हिवाळ्याच्या हंगामात स्टायलिश लूक मध्ये दिसू शकता. 
 
बऱ्याचदा स्त्रिया थंडीपासून वाचण्यासाठी शॉलची मदत घेतात, परंतु प्रत्येक वेळ अशा प्रकाराची शॉल घेणं कंटाळवाणी होऊ शकतं. आपली इच्छा असल्यास आपण आपल्या शॉलवर प्रयोग करून ती एका वेगळ्या प्रकारे घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या की शॉल स्टायलिश प्रकारे कशी घ्यावी.जर आपण साडी किंवा सूट घालत असाल तर आपल्याला शॉल या पद्धतीने घ्यावी.. 
 
* जर आपल्याला साडीवर शॉल घ्यावयाची आहे, तर खांद्यापासून कोपऱ्या पर्यंत घ्यावी किंवा आपण शॉल खांद्यावरच घेऊ शकता. अशा प्रकारे सूटवर ओढणी घेऊ नका त्या ऐवजी शॉल घ्या.
 
* आपली इच्छा असल्यास आपण शॉलच्या ऐवजी पाश्मिना स्टॉल घेऊ शकता. साडी वर आपण स्टॉलला स्कार्फ सारखे गळ्यात घालून दोन्ही टोक पुढे ठेवू शकता.
 
* शॉलला खांद्यावरून पुढे घेऊन कमरेवर एक बेल्ट लावा. या स्टाईल ला आपण साडी, सूट किंवा जीन्स वर देखील ठेवू शकता.
 
* क्रोशिया शॉलला संपूर्णरित्या गुंडाळा याच्या बाहेरच्या टोकाला पिनाच्या साहाय्याने बांधून घ्या जेणे करून हे टिकून राहील. ही स्टाईल आपण जीन्स किंवा सूटवर देखील ठेवू शकता. 
 
* एखाद्या लग्न समारंभात किंवा पार्टीला जात असाल, तर फिकट रंगाच्या साडीवर गडद आणि फुलणाऱ्या रंगाची शॉल घ्या.
 
* गडद रंगाची साडी असल्यास, फिकट पेस्टल रंगाची शॉल घ्या.