मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

मुलांनी समरमध्ये कूल कसे दिसायचे, जाणून घ्या

उन्हाळ्यात मुलांची पसंत स्लीवलेस टीशर्ट!
आजकालचे मुलं-मुली एक-दुसऱ्यांची नक्कल करण्यात एक्स्पर्ट झाले आहेत. मग ती हेअर स्टाइल असो किंवा कपड्यांची, ते वेळो वेळी त्याची नक्कल करतात. आजकाल मुलांना मुलींसारखे स्लीवलेस टीशर्ट्स घालायला आवडतात. प्रत्येक जागेवर तुम्हाला स्लीवलेस टीशर्ट घातलेले मुलं दिसतील. 
 
आता फुथपाथ असो की मोठं मोठ्या कंपन्यांचे शोरूम्स असो सर्व ठिकाणी मुलांचे स्लीवलेस टीशर्टने आपली छाप सोडली आहे. बाजारात बऱ्याच रंगात आकर्षक डिझाइनचे स्लीवलेस टीशर्ट उपलब्ध आहेत त्यात कॅप वाले, बीन कॅप, फुटबॉल, क्रिकेट खेळाडूंचे लकी नंबर, नाव, फोटो आणि स्लोगन असलेले स्लीवलेस टीशर्ट बाजारात युवांना आकर्षित करीत आहे. स्लीवलेस टीशर्ट माचो मॅनचे लुक देतात आणि मुली त्यांच्याकडे लवकरच आकर्षित होतात. हे टीशर्ट आरामदायक असून हॉट लूक देतात. 
 
मुलांना हॉट लुक देणाऱ्या स्लीवलेस टीशर्ट्स बाजारात 85 रुपयांपासून 200 रुपयांच्यामध्ये उपलब्ध आहे, तसेच ब्रांडेड स्लीवलेस 300 ते 400 रुपयांमध्ये आरामात उपलब्ध होतात. मग आता स्लिवलेस टी शर्ट घाला आणि माचो मॅन दिसा.
समरमध्ये वेडिंग फॅशन...
दोस्तांनो, सध्या लाग्नाचा हॉट सीझन आहे. लग्नातले पेहराव म्हटले की मुलींसाठी भरपूर ऑप्शन्स असतात. पण नवर्‍या मुलाचं काय? त्याने कुर्ता पायजमा, शेरवानीपर्यंत मर्यादित का राहावं? उन्हाळ्यात लग्न असेल तर आरामदायी, सुटसुटीत तरीही ट्रेंडी कपड्यांचा ऑप्शन आहेच की! 
 
अशाच काही हटके पर्यायांबद्दल....
 
* दोस्तांनो, नवरदेवासाठी खास लेहंगे आणि अनारकली डिझाईन करण्यात आले आहेत. असे पेहराव ही नवर्‍या मुलींची मक्तेदारी राहिलेली नाही. असे हटके पेहराव वेगवेगळ्या फॅशन शोजमधून समोर येत आहेत. प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सच्या सुपीक डोक्यातून अशा हटके पेहरावांची संकल्पना येत आहे. तुम्हीही असं काही तरी ट्राय करू शकता.
 
* नवरदेवासाठी धोती हा आरामदायी असा ऑप्शन ठरू शकतो. लग्नविधिंमध्ये पारंपरिक कपड्यांना प्राधान्य दिलं जातं. अशा वेळी तुम्ही ही धोती कॅरी करू शकता. गेल्या काही वर्षांमध्ये धोतीचं रुपच पालटून गेलयं.
 
* जोधपुरी पँट्स किंवा जोधपुरी धोती हा प्रकार ट्राय करायला हरकत नाही. हा प्रकार स्टायलिश दिसतो. वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये या पँट्स उपलब्ध आहेत.
 
* नेहरू जॅकेट किंवा मोदी जॅकेटचा ट्रेंड अजूनही आहे. भारतीय परांपरिक पोशाखावर जॅकेटची ही स्टाईल खुलून दिसते. यामुळे फॉर्मल आणि एथनिक असे दोन्ही लूक मिळून जातात. ही जॅकेट घालून तुम्ही लेअरिंगचा इफेक्ट साधू शकता.