रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

भारतातील टॉप 5 सुंदर समुद्र किनारे

समुद्र किनारी फिरणे, लाटा पाहात संध्याकाळी वेळ घालवणे, समुद्र किनार्‍यावरचा अनुभव हा काही वेगळाच असतो. भारतात काही खूपच सुंदर समुद्र किनारे आहेत. ज्यामधल्या 5 किनार्‍यांची माहिती तुम्हाला देत आहोत.
1. कोवालम बीच, केरळ : 
त्रिवेंद्रमपासून 16 किलोमीटरवर मलिबार किनारपट्टीला लागून कोवालम हा किनारा आहे. एक विस्मरणीय क्षण घालवण्यासाठी या समुद्राला भेट द्या. लाइट हाऊस हे या बीचचं खास आकर्षण आहे. किनार्‍यावरील नैसर्गिक दगडी सजावट आणि शांत लाटा हे या किनार्‍याची विशेषता आहे.
2. राधानगर बीच, अंदमान : 
टाईम मॅगॅझीनने आशिया खंडातील बेस्ट बीच म्हणून या बीचचा गौरव केला आहे. शुभ्र पांढरी मुलायम वाळू, तळाचा ठाव घेऊ शकणारे निळसर पाणी हे खरोखरच वेड लावणारे आहे. निसर्गाचं सौंदर्य अनुभवायला येथे जावे. स्कूबा डायव्हिंग, मासेमारी, सङ्र्खिग इत्यादीचा पुरेपूर आनंद तुम्हाला घेता येईल.
3. तारकर्ली बीच, महाराष्ट्र :
कारली नदीचा किनारा हा अरबी समुद्राच्या साथीने जगाला सुंदरतेचा संदेश देणारा आहे. महाराष्ट्रातील मालवणमधील हा एक निर्मळ आणि सुरक्षित किनारा आहे. सूर्यप्रकाशात अगदी 20 फुटापर्यंत समुद्रतळ दिसू शकतो. शांत वेळ घालवण्यासाठी येथे निश्चित भेट द्या.
4. मेरारी बीच, केरळ :
केरळमधील आलेप्पी गावाजवळील एक सुंदर किनारा. छोटे छोटे रिसॉर्ट्स, घरगुती ङ्खूड, लुसलुशीत वाळू, लाटा ही या किनार्‍याची वैशिष्टय़े आहेत.
5. बंगाराम बीच, लक्षद्वीप : 
चंदेरी वाळू, उबदार पाणी आणि नारळाची झाडे हे या किनार्‍याचं वैशिष्टय़. पावसाळ्यात हेलिकॉप्टरने बेटावर उतरण्याची सोय असलेले हे बेट जणू एक स्वर्गच. जगातील टॉप टेन किनार्‍याच्या यादीत असलेला हा छोटासा बंगाराम. स्वच्छ पाणी, रंगीबेरंगी मासे तुम्हाला वेगळाच आनंद देऊन जातो.