गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मे 2019 (18:06 IST)

केरळच्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना बुरखा आणि नकाबवर बंदी

श्रीलंकेत भीषण बॉम्बस्फोटांनंतर बुरख्यावर बंदी घातल्यानंतर आता केरळच्या मुस्लिम संस्था द्वारे संचलित एका कॉलेजमध्ये बुरखा घालू येऊ नये असे आदेश देण्यात आले आहे. 
 
कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना चेहरे झाकण्यावर बंदी आणल्याचा आदेश मुस्लिम एज्युकेशन सोसायटीने जारी केला आहे.
 
श्रीलंकेत राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्यानंतर भारतात देखील अशा प्रकारची बंदी घालण्याची मागणी होत आहे. परंतू या निर्णयाची काही संघटनांनी निंदा केली आहे.