1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मे 2019 (11:45 IST)

ऐतिहासिक चारमिनार इमारतीचा भाग कोसळला

Part of historic Charminar minaret falls
हैदराबाद येथील ऐतिहासिक वास्तु अशी ओळख असलेल्या 400 वर्षे पुरातन चारमिनार या जगप्रसिद्ध इमारतीच्या वरच्या मजल्याचा एक भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. 
 
या वास्तुच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच या वास्तुचा काही भाग कोसळल्याने एकच खळबळ उडाली. या वास्तुची पुरातत्त्व विभागाकडून तपासणी सुरू आहे. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी चारमिनाराच्या पश्चिमेकडील भागातील एक मोठा हिस्सा तुटला होता. 
 
1591 मध्ये शहरातील प्लेगची साथ संपल्याच्या आनंदात महम्मद कुली कुतुबशाह द्वारे उत्तम नमुना तयार करवण्यात आलेल्या या वास्तुला दररोज देश-विदेशांतील हजारो पर्यटक भेट देतात. या इमारतीची स्थिती नाजूक असल्याने पर्यटकांना सध्या पहिल्या मजल्यापर्यंतच जाण्याची परवानगी देण्यात येत आहे. 
 
आता चारमिनार इमारतीच्या सुरक्षेचा मुद्दा चिंतेचा विषय बनला आहे.