शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 23 एप्रिल 2019 (09:25 IST)

आयपीएलचा अंतिम सामना हैदराबादमध्ये

इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमाचा अंतिम सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. 12 मे रोजी हा सामना होणार आहे. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने स्टेडियममधील I, J आणि K हे स्टँड प्रेक्षकांसाठी खुले करण्यास नकार दिल्याने, हा निर्णय घेण्यात आला. 
 
आयपीएलच्या परंपरेनुसार प्ले ऑफचे सामने विजेत्या आणि उपविजेत्या संघांच्या मैदानावर खेळवले जातात. मात्र, बीसीसी विशाखापट्टणमची निवड केली. हैदराबादने 2018साली आयपीएलच्या अंतिम सामन्याचे यजमानपद भूषविले होते. त्यामुळे यंदा त्यांना एलिमिनेटर व क्वालिफायर 2 चे सामन्यांचे यजमानपद मिळण्याची शक्यता होती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तारखांमुळे ते शक्य होताना दिसत नाही. पोलिसांनीही या सामन्यांना सुरक्षा पुरवणे शक्य नसल्याचे सांगितले.