रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 22 एप्रिल 2019 (18:15 IST)

कोहलीचा आक्रमकपणा आणि धोनीचा संयम भारताला जिंकवू शकतो वर्ल्डकप : श्रीकांत

भारताचे माजी सलामी फलंदाज आणि निवड समितीचे माजी प्रमुख कृष्णमचारी श्रीकांत म्हणाले की सध्याचा कर्णधार विराट कोहली कधीही जबाबदारीपासून दूर पळत नसून हे एका चांगल्या कर्णधाराचे लक्षण आहे आणि तो महेंद्रसिंग धोनीसह मिळून भारताला वर्ल्डकप जिंकवू शकतो. 
 
1983 वर्ल्डकप विजेता संघाचे यशस्वी सदस्य श्रीकांत 2011 मध्ये निवड समितीचे ही प्रमुख होते जेव्हा 28 वर्षांनंतर भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. त्यांच्या मते कोहलीचा आक्रमकपणा आणि धोनीचा संयम भारताला पुन्हा वर्ल्डकप जिंकवू शकतो.
 
ते म्हणाले की विराट कोहलीच्या रूपात शानदार कर्णधार आहे. त्याच्याबद्दल चांगली गोष्ट म्हणजे तो जबाबदारी घेतो. किंग कोहली आणि कूल धोनी मिळून भारताला पुन्हा वर्ल्डकप जिंकवू शकतात. श्रीकांतने वर्ल्डकपसाठी भारताच्या 15 सदस्यीय संघाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की ही टीम खिताब जिंकण्याचा दम राखते. ते हे देखील म्हणाले की हे उत्कट, शांत मनोवृत्ति आणि दबाव सहनशक्ती हेच सर्व काही आहे. भारतीय संघाने आत्मविश्वासासह कोणत्याही दबावाशिवाय खेळलं पाहिजे.
 
ते म्हणाले की आत्मविश्वासाबद्दल बोलताना कपिल देव आठवतात, उत्कटाबद्दल बोलताना सचिन तेंडुलकर, आक्रमकतेसाठी विराट कोहली आणि धैर्य राखण्यासाठी एमएस धोनी. श्रीकांत येथे युनिसेफसह आयसीसीच्या क्रिकेट फॉर गुड प्रोग्राम 'वन डे फॉर चिल्ड्रन' साठी उपस्थित होते.