मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

नागपूरमध्ये 7 नंबर जर्सी घातलेल्या फॅनला बघून धोनीने काय केले...

टीम इंडियाचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांच्या चाहत्यांची कमी नाही. जगभरात धोनीचे चाहते आहे. त्यांच्या फलंदाजी आणि त्यांच्या स्टाइलचे लाखो फॅन्स आहे. अशात अनेकदा बघितले गेले आहे की धोनी देखील फॅन्सला भेटण्यासाठी कुठल्या थराला जातात.
 
फॅन्सला केवळ एकदा धोनीची भेट घेयची असते आणि अनेक चाहते तर त्याला भेटण्यासाठी ग्राउंडवर घुसण्याचा प्रयत्न करत असतात. असेच काही शनिवारी भारत- ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळण्यात आलेल्या दुसर्‍या वनडे सामना बघायला मिळाले. 
 
नागपूर येथे सामान सुरू असताना एक फॅन धोनीला हग करण्यासाठी मैदानात पोहचला. त्याने पांढर्‍या रंगाची 7 नंबरची जर्सी सारखं टीशर्ट घातलं होतं. फॅन मैदानात पोहचल्यावर धोनी पळू लागले आणि या दरम्यान धोनी खूपच  मजेदार मूड मध्ये होते. नंतर त्यांनी फॅनला शेकहॅड केले आणि हग देखील.
 
असे पहिल्यांदा घडलेले नाही की धोनीला भेटायला फॅन मैदानात पोहचला असेल. असे अनेकदा घडले आहे की आणि धोनी देखील चाहत्यांना निराश करत नाही.