शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रांची , शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019 (15:05 IST)

रांची क्रिकेट स्टेडियच्या पॅव्हेलियनला दिले धोनीचे नाव

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेटसाठी केलेल्या कामगिरीची दखल त्याच्या घरच्या मैदानावर घेण्यात आली आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या रांची स्टेडियमवरील दक्षिण स्टँड आता एम. एस. धोनी पॅव्हेलिन नावाने ओळखला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर धोनीने झारखंडला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. त्याच्या या कागिरीची दखल घेऊन त्याला हा सन्मान देण्यात येणार आहे. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा ऑस्ट्रेलियाच्या दौरत होण्याची शक्यता आहे.