बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

अनुष्काच्या कानातल्यावर सर्वांची नजर

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ही बंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मुंबई आणि बंगलोर यांच्यात सुरू असलेल्या आयपीएल सामन्यात आकर्षणाचे बिंदू होती. या वेळेस ती आपल्या ड्रेसमुळे नव्हे तर आपल्या कानातल्यांमुळे आकर्षित करत होती.
 
आयपीएल सामन्यात अनेकांची आपल्या लुकमुळे कॅमर्‍यात कैद होण्याची इच्छा असते परंतू सेलिब्रिटीवर तशीच कॅमर्‍याची नजर असतेच. आणि जर ती विराटची बायको असेल तर नक्कीच तिच्या लुकवर कॅमेरा फोकस होणे साहजिक आहे.
 
विराटच्या प्रत्येक शॉटवर जेव्हा अनुष्का खुशीने झूमत होती तेव्हा तिचे कानातले उठून दिसत होते. अनुष्काचे कानातले हातातल्या बांगडीपेक्षाही मोठे होते.
 
'स्पेशल बॉक्स' हून सामना बघत असलेल्या अनुष्काचे मोठे कानातले बघून एका तरुणीने 1961 मध्ये प्रदर्शित चित्रपट 'गंगा जमुना' या चित्रपटातील (दिलीप कुमार-वैजयंती माला यांच्यावर चित्रीकरण केलेले) शकील बदांयुनी द्वारे लिखित आणि लता मंगेशकर द्वारा गायलेले गीत म्हटले...'ढूंढो रे साजना मोरे कान का बाला...'।
 
या आयपीएलमध्ये विराट कोहली 8 सामन्यांमध्ये 349 धावा घेऊन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसर्‍या पायरीवर आहे. प्रत्येक सामान्यात अनुष्का आपल्या पतीचा उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियममध्ये असते. केकेआर सोबत सामन्यादरम्यान जेव्हा कोहलीने कार्तिकचा कॅच धरला होता तेव्हा अनुष्काच्या रिएक्शनची सोशल मीडियावर चर्चा रंगली होची.