शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : मंगळवार, 17 एप्रिल 2018 (16:52 IST)

विराट - अनुष्काचे सामन्यातील फोटोचे मेम्स

रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरु विरुद्ध  किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सामन्यात विराटला चिअर करण्यासाठी 
अनुष्का शर्मा स्टेडिअममध्ये आली होती. अनुष्काचं विराटला चिअर करणं इंटरनेटवरही चर्चेचा विषय आहे. ज्याप्रमाणे विराट मैदानावर खेळताना आक्रमक असतो अगदी त्याच शैलीत अनुष्का विराटला चिअर करत होती. 
 
विराट व अनुष्काचे त्या सामन्यातील फोटो एकत्र करून नेटिझन्सने विविध मेम्स तयार केले आहेत. मेट्रोमध्ये सीट न मिळण्यापासून ते बाहुबली सिनेमातील सीन रिक्रिएट करेपर्यंच असे विविध मेम्स नेटिझन्सने तयार केले आहेत.  कॅप्टन कोहलीच्या ब्रिगेडने किंग्ज इलेव्हनने दिलेले 156 धावांचं आव्हान सहजपणे पूर्ण केलं. 19.3 ओव्हरमध्ये त्यानी आव्हान पूर्ण केलं. आरसीबीचा पहिला विजय ज्याप्रमाणे टीमने साजरा केला त्याचप्रमाणे अनुष्का शर्मानेही केला. टीम सामना जिंकताच अनुष्का स्टेडिअममध्ये उभी राहिली.