रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

कोहलीला 12 लाख रुपयांचा दंड

बंगळूरच्या मैदानात झालेल्या रोमहर्षक सामन्यात  भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर धोनी आणि भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली पहिल्यांदाच एकमेकांसमोर समोर आले होते. यावेळी बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली चांगली कामगिरी करण्यासोबतच नेतृत्वगुण दाखवून देण्यातही अपयशी ठरला. आरसीबीने मर्यादित वेळेत षटकांचा कोटा पूर्ण न केल्याने विराट कोहलीला 12 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. 
 
धोनीच्या संघासमोर गोलंदाजी करत असताना रणनीती आखताना कोहली वेळेचे भान विसरला. सामन्यादरम्यान गोलंदाजीचा कोटा मर्यादित वेळेत पूर्ण करावयाची जबाबदारी संपूर्णपणे न कर्णधाराची असते. पण आरसीबी ने मर्यादित वेळेत षटके पूर्ण केली नाहीत. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीला 12 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. आयपीएल कोड ऑफ कंडक्ट (code of conduct) नियमावलीनुसार मर्यादित वेळेत षटकांचा कोटा पूर्ण न झाल्याने त्याच्यावर दंडाची कारवाई करण्यात आली आहे.  यंदाच्या आयपीएल हंगामात दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणारा विराट कोहली हा पहिलाच कर्णधार आहे.