वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा
येत्या ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. यात अंबाती रायुडूला मात्र वर्ल्ड कपच्या टीममधून डच्चू देण्यात आला आहे. तर ऋषभ पंत याच्याऐवजी दिनेश कार्तिकवर निवड समिती आणि विराट कोहलीने विश्वास दाखवला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वामध्ये भारतीय टीम हा वर्ल्ड कप खेळणार आहे, तर रोहित शर्मा उपकर्णधार आहे. १५ सदस्यांच्या या भारतीय टीममध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे तीन फास्ट बॉलर, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे दोन स्पिनर, तसंच हार्दिक पांड्या, विजय शंकर, रवींद्र जडेजा आणि केजार जाधव हे चार ऑल राऊंडर आहेत. रवींद्र जडेजा आणि केदार जाधव यांचा उपयोग स्पिनर म्हणून आणि हार्दिक पांड्या, विजय शंकर यांचा वापर मध्यमगती बॉलर म्हणून करता येईल.
भारतीय टीम अशी
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर.