1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2019 (18:04 IST)

वेस्टइंडीज क्रिकेट संघात मोठा फेरबदल, वर्ल्डकप पूर्वी रीफर बनले विंडीज कोच

cricket
वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी वेस्टइंडीज क्रिकेट संघाला एक मोठा फेरबदल करावा लागत आहे. शुक्रवारी फ्लाईड रीफर यांना संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, रीफल काही महिन्यांपूर्वी मुख्य प्रशिक्षक असलेल्या रिचर्ड पायब्स यांची जागा घेतील. 
 
वेस्टइंडीज क्रिकेटचे नवीन अध्यक्ष रिकी स्केरिटने टीममध्ये नवीन बदल जाहीर केले आहे, संपूर्ण निवड पॅनेल देखील बदलली गेली आहे. रॉबर्ट हायंस यांना कोर्टनी ब्राउनच्या जागी प्रमुख निवडक नियुक्त केले आहे. रीफरला हेड कोच बनविण्यात आले आहे. गेल्या वर्षी ते बांग्लादेश दौर्‍यात मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. 
 
स्केरिट म्हणाले की हायंस्सच्या रुपात आम्हाला एक महान अंतरिम सिलेक्टर सापडला आहे. जो आमच्या निवड धोरणाचा सिद्धांत समजतो. आम्हाला खात्री आहे की हायंस सर्व खेळाडूंना एकत्र घेऊन चालतील आणि वेस्टइंडीज क्रिकेटच्या हितासाठी काम करतील. मार्चमध्ये स्केरिटला वेस्ट इंडीजचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. डेव्ह कॅमेरॉनच्या तुलनेत त्यांना 8-4 असे मत दिले गेले.