शनिवार, 13 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 1 मे 2019 (17:01 IST)

हल्ल्याच्या सूत्रधारांना सोडणार नाही

not leave
गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यामध्ये 15 जवान शहीद झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये हल्ल्याच्या सूत्रधारांना सोडणार नाही असं म्हटलं आहे. मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या हल्ल्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी एका ट्विटद्वारे दिली आहे.गडचिरोलीतील हल्ला हा भ्याड असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. या जवानांनी देशासाठी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सांत्वना व्यक्त करतो असंही सिंह यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.