शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 मे 2019 (16:48 IST)

स्वच्छतागृहामध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार

बारामतीतील एका माध्यमिक विद्यालयातील 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर त्याच शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने बलात्कार केला आहे. ही घटना रविवारी सकाळीच्या सुमारास घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने बारामती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे. 
 
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हे एकाच  शाळेत शिक्षण घेत आहे. ते या मुलीच्या ओळखीचे आहेत. यापैकी एकाने हायस्कूलच्या आवारातील स्वच्छतागृहामध्ये या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. तर या आरोपीला अन्य एका विद्यार्थ्याने मदत केल्याची तक्रार या विद्यार्थिनीने केली आहे.