1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 मे 2019 (16:53 IST)

नक्षलवाद्यांना उत्तर देण्यास महाराष्ट्र पोलिस सक्षम

Maharashtra DGP
नक्षलवाद्यांचं आव्हान मोडून काढू, त्यांना तोडीस तोड उत्तर देऊ, मी स्वत: हल्ला केलेल्या ठिकाणी जातोय, असे महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी सांगितले. नक्षलवाद्यांना उत्तर देण्यास महाराष्ट्र पोलिस सक्षम आहे. नक्षलवाद्यांचे आव्हान आम्ही मोडीत काढू. त्यांना तोडीस तोड उत्तर देऊ, असेही त्यांनी सांगितले. या घटनेनंतर महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी माध्यमांशी संवाद साधून, स्फोटाबाबत सविस्तर माहिती दिली.
 
गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यात 15 जवान शहीद झाले, तर एका चालकाचा मृत्यू झाला. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास स्फोट घडवण्यात आला, अशी माहिती पोलिस महासंचालकांनी दिली. मात्र, या स्फोटाच्या घटनेला गुप्तचर यंत्रणेचं अपयश म्हणता येणार नाही, असेही पोलिस महासंचालकांनी नमूद केले.