1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2019 (12:01 IST)

आयुर्वेदिक मसाज केंद्रांमुळे प्रसिद्ध 'वर्कला'

Varkala Thiruvananthapuram
वर्कला एक शांत आणि नीरव वस्ती आहे, जी थिरुवनंतपुरम जिल्ह्याच्या सीमेलगत स्थित आहे. येथे पर्यटकांच्या आकर्षणाची अनेक स्थळे आहेत-जसे मनोरम समुद्र किनारा, 2000 वर्ष जुने विष्णु मंदीर आणि आश्रम तसेच समुद्रकिनार्‍यापासून अगदी थोड्या अंतरावर असलेला शिवगिरी मठ. 
 
वर्कलाच्या निरभ्र तटावर एक शांत रिसॉर्ट आहे, जेथे नैसर्गिक खनिजयुक्त पाण्याचे झरे आहेत. असे मानले जाते की या किनार्यासवरील पाण्यात अंघोळ केल्यावर शरीर तसेच आत्म्याचीही शुद्धी होते, आणि म्हणूनच याचे नाव ’पापनाशम तट’ असे पडले आहे. 
 
येथून थोड्या अंतरावर एका शिखरावर दोनहजार वर्ष जुने असे जनार्दनस्वामी मंदीर आहे. या शिखरावरून आपण समुद्र किनार्यादवरील मनोहर दॄष्यांचा मनमुराद आनंद लुटू शकता. जवळच एक प्रसिद्ध शिवगिरी मठ आहे, जो हिंदू समाज सुधारक आणि तत्त्वज्ञ श्री नारायण गुरू (1856 - 1928)यांच्या द्वारा स्थापन केला गेला आहे. या गुरूंच्या समाधीच्या दर्शनासाठी दरवर्षी शिवगिरी तीर्थयात्रेच्या काळात –(30 डिसेंबर ते 1जानेवारी) लाखो श्रद्धाळू येथे येतात. नारायण गुरू यांनी जातीपातीमध्ये बाटलेल्या या समाजात “एक जात, एक धर्म आणि एकच ईश्वर “ या मताचे प्रतिपादन केले होते.
वर्कला येथे आपल्याला निवासाची उत्तम सोय उपलब्ध होते. याचबरोबर येथे असलेल्या अनेक आयुर्वेदिक मसाज केंद्रांमुळे हे ठिकाण एक लोकप्रिय आरोग्य केंद्र म्हणून मोठ्या वेगाने प्रसिद्ध होत आहे..
 
आकर्षणे: समुद्र किनारे, नैसर्गिक शुद्ध पाण्याचे झरे, शिवगिरी मठ आणि 2000-वर्ष जुने विष्णूचे प्राचीन मंदीर.
 
स्थान: थिरुवनंतपुरम शहरापासून उत्तरेस 51 किमी आणि थिरुवनंतपुरम जिल्यातीलच कोल्लम पासून दक्षिणेस 37 किमी दूर.
 
येथे पोहोचण्यासाठी:
जवळील रेल्वे स्थानक: वर्कला-साधारण  3 किमी दूर
जवळचा विमानतळ: थिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ, साधारण 57 किमी दूर.