testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मुन्नार : चहा-कॉफीचे मळे

munnar
मुन्नार (केरळ) ब्रिटिशांनी विकसित केलेल्या हिल स्टेशनसारखेच मुन्नारही एक थंड हवेचे ठिकाण आहे. केरळच्या
इडुवकी जिल्ह्यात मुन्नार आहे. तीन पर्वतरांगा-मुथिरपुझा, नलयन्नी आणि कुंडल यांच्या संगमावर हे वसलेले आहे. सुद्रपाटीपासून त्याची उंची अंदाजे 1600 मीटर आहे. आल्हाददाक वातावरण आणि रमणीय
निसर्ग यामुळे आता ते पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. कोणत्याही महिन्यात मुन्नारला भेट देता येते. इथल्या विस्तीर्ण भूभागात पसरलेली चहाची शेती, वसाहती, बंगले, छोट्या नद्या, झरे आणि थंड हवामान यामुळे पर्यटक इकडे आकर्षित होतात.
मुन्नारमध्ये टाटांनी तार केलेले टी म्युझियम, स्पाइस गार्डन, जंगल सफारी आणि हत्तीची सवारी ही बघण्यासारखी पर्यटनस्थळे आहेत. इंग्रजांच्या काळातली केबल कार आणि सुरुवातीची रेल्वे यांचे काही जुने भाग तिथे जतन केले आहेत. चहाच्या पानापासून चहा पावडर कशी तयार केली जाते, याचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. येथे अनेक कंपन्यांचे चहाचे मळे आहेत, पण ते पाहणसाठी त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. मुन्नारच्या मसाल्याच्या बागाही बघण्यासारख्या आहेत. त्याचप्रमारे इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान, आनामुडी शिखर, माट्टपेट्टी, पल्लिवासल, चिन्नकनाल हीसुद्धा प्रेक्षणीय स्थळे आहेत.
दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) - हिमालय पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या थंड हवेच्या ठिकाणामधील महत्त्वाचे 'हिल स्टेशन' म्हणजे दार्जिलिंग. हे स्थळ पश्चिम बंगालमध्ये आहे. त्याला 'क्वीन ऑफ द हिल्स' या नावाने जगभरात ओळखले जाते. दार्जिलिंग प्रामुख्याने चहाचे मळे आणि दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेसाठी प्रसिद्ध असून युनेस्कोने त्याला
जागतिक वारशाचा दर्जा प्रदान केला आहे. दार्जिलिंगचा चहा जगभरात प्रसिद्ध आहे.

कुर्ग (कर्नाटक) कुर्ग हा कर्नाटक राज्याच्या नैर्ऋत्य कोपर्‍यात लपलेला छोटासा जिल्हा आहे. कुर्ग म्हणजे डोंगर उतारावरचे घनदाट जंगल. कॉङ्खीची शेतीहा इथला मूळ व्यवसाय. शिवाय चहा आणि मसाल्याच्या पदार्थांची लागवडही येथे होते. त्यामुळे चहा कॉफीचे विविध स्वाद आपण येथे अनुभवू शकतो. डोंगराच्या
उतारावर दूरपर्यंत पसरलेले कॉफीचे मळे प्रेक्षणीय आहेत. शिवाय कॉफी कशी तयार होते हे जाणून घेण्यासाठी
स्थानिक टूर आहेत.

आसाम- आसामचा चहा हा जगप्रसिद्ध आहे. जगभर आसामच्या चहाची निर्यात केली जाते. आसाममधल्या काझीरंगाच्या परिसरात विस्तीर्ण पसरलेले चहा-कॉफीचे मळे आहेत. जिथवर नजर जाते, तिथवर हे हिरवेगार मळे पाहायला मिळतात. काझीरंगा अभयारण्य आणि गुवाहाटीचे प्राणिसंग्रहालय ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. शिवसागर हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे. गोलाघाट हे चहा आणि वेताच्या वस्तूबद्दल प्रसिद्ध आहे.


यावर अधिक वाचा :

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस ...

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान
कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज ...

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ...

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम ...

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन
यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची ...

श्रेयशच्या 'टाईमपास रॅप'मधून खरीखुरी बात

श्रेयशच्या 'टाईमपास रॅप'मधून खरीखुरी बात
मराठीतील पहिला रॅपर 'किंग जेडी' अर्थात श्रेयश जाधव बऱ्याच काळाने एक भन्नाट रॅप सॉंग घेऊन ...

ऐश्वर्या रॉय बच्चन आराध्याला लहान वयातच मिळणार्‍या ...

ऐश्वर्या रॉय बच्चन आराध्याला लहान वयातच मिळणार्‍या अटेन्शनमुळे घाबरत आहेत का?
ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांना बच्चन कुटुंबात सर्वाधिक अटेन्शन ...

देसी गर्ल प्रियांका चोप्राने परदेशात पहिल्यांदा करवा चौथ ...

देसी गर्ल प्रियांका चोप्राने परदेशात पहिल्यांदा करवा चौथ साजरा केला, बघा फोटो
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक-अभिनेता निक जोनास यांची ...

‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित

‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित
अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार व प्रणय चोकसी आणि डान्सिंग शिवा प्रस्तुत मराठी ...

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'
तिन्ही 'गर्ल्स' गुलदस्त्यातून बाहेर आल्यानंतर, आता त्या काय धमाल करणार याचा अंदाज ...