Dharma Sangrah
✕

Feng Shui Tips: प्रगती साठी घरात लाफिंग बुद्धा या दिशेला ठेवा

Updated: शुक्रवार, 5 जानेवारी 2024 (16:20 IST)
 
लाफिंग बुद्धा हसताना - 
वास्तूमध्ये घराची पूर्व दिशा ही कुटुंबासाठी नशीब आणि सुख-शांतीचे स्थान असल्याचे म्हटले आहे. जर तुम्हाला तुमच्या घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम आणि समन्वय वाढवायचा असेल तर पूर्व दिशेला लाफिंग बुद्ध ठेवा जो दोन्ही हात वर करून हसत आहे. या व्यतिरिक्त तुम्ही घरी लाफिंग बुद्धाची मूर्ती ध्यानात बसलेली देखील  ठेवू शकता, त्याच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात केवळ शांतीच नाही तर घरातील वातावरणही चांगले राहील.
 
कमंडलु घेताना लाफिंग बुद्धा -
खूप मेहनत करूनही जर तुम्हाला तुमच्या कामात यश मिळत नसेल तर तुम्ही दोन्ही हातात कमलंदा धरलेली लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवावी, ती तुम्ही मुलांच्या खोलीतही ठेवू शकता.
 
ड्रॅगनवर बसलेला -
 जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात जादूटोणा आहे किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांवर कोणाची वाईट नजर पडली आहे, तर तुम्ही लाभ मिळवण्यासाठी दैवी शक्तींचा अधिपती लाफिंग बुद्ध, ड्रॅगनवर बसलेला तुमच्या घरात ठेवावा.
 
लाफिंग बुद्धा विथ वू लू-
जर तुम्ही अनेकदा आजारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आजारी असेल तर लवकर बरे होण्यासाठी तुम्ही आजारी व्यक्तीच्या उशीजवळ वू लू असलेला लाफिंग बुद्ध ठेवावा.
 
लाफिंग बुद्धा पैशांच गाठोडं नेताना -:
 ज्या लोकांना पैसे जमवता येत नाहीत त्यांनी त्यांच्या घरात पैशांचा गठ्ठा घेऊन जाणारी लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवावी. यामुळे पैशाशी संबंधित बाबींमध्ये लाभ मिळू शकतो. जर तुम्ही तुमच्या घराच्या आग्नेय दिशेला लाफिंग बुद्ध ठेवला तर या दिशेची सकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे धन आणि आनंद स्वतःकडे आकर्षित होतो. घरात राहणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढते.
 
Edited By- Priya Dixit     
 
 

सर्व पहा

Shubh Margashirsha Guruvar Images शुभ मार्गशीर्ष गुरुवार शुभेच्छा इमेज

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

सत्यनारायणाची आरती Satyanarayan Aarti Marathi Lyrics

Tripurari Purnima 2026 : त्रिपुरारी पौर्णिमा रोजी दीपदानाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Guru Nanak Jayanti : गुरु नानक देव यांचे १० अनमोल वचन

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments