शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 1 मार्च 2023 (13:41 IST)

फेंगशुई शास्त्राप्रमाणे असे असावे लिव्हिंग रूम

driving room
फेंगशुई ही चायनीज कला आणि शास्त्र आहे. याचा वापर करून घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार करता येतो. याचा थेट परिणाम आपल्या नात्यांवर, आथिर्क परिस्थितीवर आणि आरोग्यावर होतो. म्हणून आज जाणून घ्या की फेंगशुई शास्त्राप्रमाणे आपले लिव्हिंग रूम कसे असावे ते-
 
घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांसोबत जास्त वेळ घालवतं ती जागा म्हणजे लिव्हिंग रूम. येथे नेहमी सजीवता असावी. रंगाचा वापरत करताना सावध राहावे. येथे सजीव वाटणारे चित्र लावावे.
 
लिव्हिंग रूममध्ये फिश टँक असणे खूपच शुभ ठरतं.
 
लिव्हिंग रूममध्ये धबधबा किंवा पाण्याशी निगडित फोटो किंवा शोपीस असणे योग्य ठरेल.
 
घरातील इतर खोलींपेक्षा टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गझेट्स लिव्हिंग रूममध्ये ठेवणे अधिक योग्य.
 
आपल्या घरातील दारांवर आपण फेंगशुईचे शिक्के लटकवू शकता ज्याने घरात समृद्धी येते. आपल्याला तीन जुने चीनी शिक्के लाल रंगाच्या दोर्‍यात घालून दाराच्या हँडलवर बांधायचे आहेत. शिक्के आतल्या बाजूच्या हँडलला बांधावे आणि घरातील सर्व दारांना नव्हे तर केवळ मुख्य दारावर हे शिक्के लावणे फायदेशीर ठरेल.