शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Updated : शनिवार, 16 एप्रिल 2022 (14:54 IST)

Fengshui आपल्या जीवनात आनंद आणि प्रेमाला आर्कषित करतात या गोष्टी

lobebirds fengshuie
वास्तूशी निगडीत चाइनीज ट्रेडिशन फेंगशुई नकारात्मक आणि सकारात्मक उर्जेबद्दल अनेक गोष्टींसाठी ओळखली जाते. फेंगशुईनुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या घरांमध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. या सकारात्मक वाइव्सचा आपल्या जीवनसाथीदारावर ही प्रभाव पडतो. कधी-कधी असं होतं की तुमच्या आयुष्यात प्रेमाची उणीव जाणवू लागते किंवा प्रेमात पडल्यानंतरही छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणे सुरू होतात. अशा परिस्थितीत तुम्हाला खूप सकारात्मक उर्जेची गरज असते. फेंगशुईमध्ये अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद आणि प्रेम आकर्षण वाढवेल.
 
लाल आणि गुलाबी रंग
फेंगशुईनुसार, लाल आणि गुलाबी हे प्रेम, उत्कटता आणि नातेसंबंधांचे रंग आहेत. हे रंग घरात तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या संबंधात आकर्षिण वाढवण्याचा काम करतं. परंतु तुमच्या घरात लाल रंगाचा जास्त वापर करू नका. लाल रंग अतिशय रागीट आणि नियंत्रणाबाहेर असलेल्या वाइव्ससाठी देखील ओळखला जातो.
 
कपल वस्तू
घरात कोणतीही एकल वस्तू ठेवू नका. उदाहरणार्थ, फ्लॉवर पॉट एकच ठेवण्याऐवजी दोन ठेवा. डिनर टेबलवर फॅन्सी डबल मेणबत्ती ठेवा. दुहेरी गोष्टी दोन किंवा दोन लोकांमधील प्रेम आणि समज दर्शवतात.
 
अरोमा थेरपी
घरामध्ये सकारात्मक आणि आरामदायी ऊर्जा आकर्षित करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. एक छान सुगंध नेहमी तुमच्या कामुक संवेदना जागृत करतो. यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडे येण्याची इच्छा होईल. यामुळे तुमच्या घरातील वातावरण रोमँटिक होईल.
 
मजबूत किंवा ठोस वस्तू
घरात मोडणाऱ्या वस्तूंऐवजी मजबूत किंवा भरीव वस्तू ठेवा. बेडचे हेडबोर्ड, खुर्चीचे पाय नेहमी मजबूत असावेत. यामुळे तुम्हाला अशा गोष्टींमध्ये आत्मविश्वास मिळेल की त्या गोष्टी तुटणार नाहीत, यामुळे 
 
तुमच्या मनात आनंदी वाइव्स येतील. तुम्हाला तुमच्या नात्यात विश्वास आणि स्थिरता देखील जाणवेल.