शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Updated : शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (08:50 IST)

हरतालिका तृतीया 2024: 9 सोपे मंत्र, पूजेनंतर जागरण दरम्यान जपावे

Hartalika Tritiya Vrat 2024 : धार्मिक शास्त्रांनुसार दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला महिला हरत‍ालिका तृतीया हा व्रत पाळतात. या दिवशी महिला उपवास ठेवतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि अविवाहित मुली इच्छित वर मिळण्यासाठी हे व्रत ठेवतात. यावर्षी हे व्रत 06 सप्टेंबर 2024, शुक्रवारी पाळले जात आहे.
 
मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया या दिवशी निर्जला व्रत करतात आणि वाळू किंवा मातीच्या मूर्ती बनवून भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करतात. आणि या दिवशी रात्रीच्या वेळी काही विशेष मंत्रांचा जप करण्याचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.
 
हरतालिका तीजसाठी रात्री माता पार्वतीचे नऊ सोपे मंत्र -
 
देवी पार्वतीचे 9 मंत्र- Hartalika Teej mantra
 
1. ॐ उमाये नम:।
 
2. गण गौरी शंकरार्धांगि यथा त्वं शंकर प्रिया। 
मां कुरु कल्याणी कांत कांता सुदुर्लभाम्।।
 
3. कात्यायिनी महामाये महायोगिनीधीश्वरी 
नन्द-गोपसुतं देवि पतिं में कुरु ते नम:
 
4. ॐ शांतिरूपिण्यै नम:।
 
5. 'उमामहेश्वरसायुज्य सिद्धये हरितालिका व्रतमहं करिष्ये'।
 
6. ॐ जगत्प्रतिष्ठायै नम:।
 
7. ॐ शिवाये नम:।
 
8. ॐ जगद्धात्रयै नम:।
 
9. ॐ पार्वत्यै नम:/ ॐ पार्वतीपतये नमः।