Daily Horoscope

खंडोबाची पूजा करण्याची पद्धत

Updated: शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (12:05 IST)
 
अशा प्रकारे या 16 उपचारांनी केलेली पूजा म्हणजे षोडशोपचारी पूजा होय. एखाद्या विशिष्ट प्रसंगी केली जाणारी ही मंत्रोच्चारात षोडशोपचारी पुजा  पुराणोक्त आणि वेदोक्त केली जाते. या मधील पुराणोक्त पूजा प्रचलित आहे. ही पुराणोक्त आणि वेदोक्त पूजा करताना सर्वप्रथम प्रथम आचमन, देवाचे ध्यान, देशकाळाचे उच्चारण, संकल्प करण्याचा प्रघात आहे. खंडेरायाची पूजा करताना अभिषेक विधी रुद्र अध्यायाची आवर्तने करून एकादशनी, रुद्र, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र करण्याची प्रथा आहे.
 
 
* पंचोपचारी पूजा- 
विविध पाच उपचारांनी केलेली पूजा म्हणजे पंचोपचार पूजा होय, या पूजनात पुढील पाच उपचारांचा समावेश होतो. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य यांचा समावेश असतो.
 
1 गंध- हळद, कुंकू इत्यादी सौभाग्यद्रव्ये, अक्षता.
2 पुष्प- फुले, पत्री इत्यादी.
3 धूप -धूप जाळणे किंवा उदबत्ती लावणे.
4 दीप - निरांजन ओवाळणे.
5 नैवेद्य - दूध किंवा काही खाद्यवस्तूंचा नैवेद्य दाखवावा. देवापुढे विडा, दक्षिणा ठेवावी. कापूर लावून आरती म्हणावी.
 
टीप - ज्या मूर्तीना स्नान घालणे शक्य नसते त्यावेळी ही पद्धत वापरतात.
 
* सप्तपुजा - मार्तंड विजय ग्रंथात काही पूजेच्या प्रकारांची माहिती सांगितली आहेत. 
* बिल्व पुजा- या पूजेत देवाला बिल्वाचे किंवा बेलाचे पान वाहतात. या पूजेला बिल्वपूजा असे ही म्हणतात.
* गंध पुजा- या पूजेत देवाला चंदनाच्या गंधाने पुजा करतात.
* भात पुजा - या पूजेत देवाला भात दिला जातो. ही पुजा भाताने बांधलेली असते त्या मुळे ह्याला भात पुजा असे म्हणतात.
* भंडार पुजा - हळदीच्या चूर्णाने बांधलेली पुजा.
* धान्य पुजा- गहू, तांदूळ, हिरवेमुग, तांबडा म्हसूर, हरभरा डाळ इत्यादी धान्यांनी बांधलेली पुजा धान्यपुजा म्हणवली जाते.
* दवणा पुजा- दवण्याने बांधलेली पुजा.
* पुष्प पुजा- विविध प्रकारच्या फुलांनी बांधलेली पुजा पुष्प पुजा असते.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments