सोमवार, 15 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (10:23 IST)

Dev Uthani Ekadashi 2020 पितृदोषाच्या निवारणासाठी 4 उपाय

भगवान श्री हरी विष्णू हे आषाढ शुक्ल एकादशीला 4 महिन्यासाठी झोपतात आणि कार्तिक शुक्ल एकादशीला जागे होतात. म्हणून कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशीला देव उठनी एकादशी म्हणतात. याला हरी प्रबोधनी एकादशी आणि देवोतत्थान एकादशी असे ही म्हणतात. असे म्हणतात की देवोत्थान एकादशीचा उपवास केल्यानं हजार अश्वमेघ आणि राजसूय यज्ञ केल्याचे फळ मिळते.
 
1 पितृदोषाने पीडित लोकांनी या दिवसाचे विधिवत उपवास केले पाहिजे. पितरांसाठी उपवास केल्याने अधिक लाभ मिळतं ज्या मुळे त्यांच्या पितरांना नरकाच्या त्रासापासून सुटका मिळू शकेल.
 
2 या दिवशी भगवान विष्णू किंवा आपल्या इष्टदेवांची उपासना करावी. या दिवशी "ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप केल्यास फायदा होतो.
 
3 शाळीग्रामासह तुळशीचे आध्यात्मिक लग्न लावतात. या दिवशी तुळशीची पूजा करण्याचे महत्त्व आहे. तुळशीचे पान अकाळ मृत्यू होण्यापासून वाचवते. शाळीग्राम आणि तुळशीची पूजा केल्यानं पितृदोषांचे शमन होते.
 
4 या दिवशी देव उठनी एकादशीची पौराणिक कथा ऐकल्याने आणि सांगितल्याने पुण्याची प्राप्ती होते.
 
श्रीहरी विष्णू यांना जागविण्यासाठी या मंत्राचे जप करावे - 
उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद त्यज निद्रां जगत्पते। 
त्वयि सुप्ते जगन्नाथ जगत् सुप्तं भवेदिदम॥ 
उत्थिते चेष्टते सर्वमुत्तिष्ठोत्तिष्ठ माधव। 
गता मेघा वियच्चैव निर्मलं निर्मलादिश:॥ 
शारदानि च पुष्पाणि गृहाण मम केशव।'