गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (15:54 IST)

Dev Uthani Ekadashi 2020 प्रबोधिनी एकादशी शुभ मुहूर्त

कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. कर्क संक्रांत आषाढ मासात येते म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस 'देवशयनी एकादशी' म्हटले आहे; त्या दिवशी देव झोपी जातात तसेच कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात म्हणून तिला 'प्रबोधिनी एकादशी' असे म्हटले जाते. या एकादशीला देवउठनी एकादशी किंवा देवोत्थनी एकादशी देखील म्हणतात. 
 
 
देवउठनी एकादशी 25 नोव्हेंबर 2020 बुधवार असून शुभ मुहूर्त या प्रकारे आहे- 
 
देवउठनी एकादशी 2020 शुभ मुहूर्त
 
एकादशी तिथी प्रारंभ - 25 नोव्हेंबर 2020 बुधवार सकाळी 2 वाजून 42 मिनिटापासून
एकादशी तिथी समापन - 26 नोव्हेंबर 2020 गुरुवार सकाळी 5 वाजून 10 मिनटापर्यंत
शुभ वेळ- 6:00 ते 9:11, 5:00 ते 6:30 पर्यंत
 
राहुकाल- दुपारी 12:00 ते 1:30 वाजेपर्यंत
 
देवोत्थान एकादशी उपवास सोडण्याची वेळ : 26 नोव्हेंबर, 13:11:37 ते 15:17:52 
हरी वासरा समाप्ती क्षण : 26 नोव्हेंबर, 11:51:15 ला
भगवान श्री विष्णू जेव्हा झोपलेले असतात तेव्हाच्या चार महिन्यात विवाह इत्यादी मंगल कार्यांचे आयोजन करणे वर्जित मानले जाते.

तुळशीचे लग्न कसे करावे, सोपी पद्धत जाणून घ्या

भगवान श्री विष्णू जागे झाल्यावरच म्हणजेच ह्या प्रबोधिनी एकादशी पासूनच सर्व शुभ कार्यास सुरवात करता येते.